बेंगलोर शहरा बरोबरच बेळगाव येथेही हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळपासून बेंगलोर शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर बेळगावचे पोलीस आयुक्त लोकेश कुमार यांनी बेळगाव येथे सुद्धा हाय अलर्ट जारी केला असून शहरातील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आलाय .
स्टार हॉटेल रेल्वे स्थानक ,बस स्थानक, सिनेमागृहे आणि इतर ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे .नागरिकांनी कोणत्या दहशतीखाली राहू नये .काहीही संशयास्पद आढळल्यास थेट जवळच्या पोलिस ठाण्याला कळवावे .असे आवाहन करण्यात आले आहे .
लॉजिंग हॉटेलमध्ये बाहेरील माणसांना प्रवेश देताना योग्य ती तपासणी करूनच प्रवेश द्यावा अशी सूचना सुद्धा करण्यात आलेली आहे.बंगळुरु पोलीस आयुक्त भास्कर राव यांनी बंगळुरू शहरात हाय अलर्ट दिला होता त्या नंतर लोकेशकुमार यांनीही बेळगाव शहरात हाय अलर्ट दिला आहे.