माजी विद्यार्थी आणि शिक्षण संस्था यांच्यामधील दुवा म्हणजे माजी विद्यार्थी संघटना.माजी विद्यार्थी संघटनेचा संस्थेच्या वाटचालीत महत्वाचा सहभाग असतो.विद्यार्थी आणि संस्था यांच्यातील भावनिक बंध महत्वाचा आहे.माजी विद्यार्थी संघटना म्हणजे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यासाठी व्यासपीठ आहे.भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांना जोडण्याचे मोलाचे कार्य संघटनेद्वारे होते असे उदगार शिक्षणतज्ज्ञ प्रा.डॉ.अनिल कालकुंद्री यांनी काढले.
जीएसएस कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.व्यासपीठावर कॉलेजच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सुधीर शानभाग,प्राचार्य नागराज हेगडे,संघटनेचे अध्यक्ष प्रा.भरत तोपीनकट्टी ,अनंत लाड उपस्थित होते.
माजी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या उभारणीत ,विस्तारात आपला सहभाग दर्शवावा.आपल्याला शक्य असेल त्या पद्धतीने संस्थेला मदत करावी.माजी विद्यार्थी हे कॉलेजचे दूत असतात. कॉलेजने देखील किमान वर्षातून एकदा आजी माजी विद्यार्थ्यांना बोलवून एकमेकांशी संवाद साधण्याची संधी द्यावी.संवाद वाढल्यामुळे नाते बळकट होते असेही अनिल कालकुंद्रीकर म्हणाले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर शानभाग यांनी माजी विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि आपल्या सूचना वेळोवेळी कराव्यात असे आवाहन केले.
विलास अध्यापक,सहदेव बाळेकुंद्री ,गौरी मांजरेकर या माजी विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी प्राचार्य नागराज हेगडे यांनी स्वागत केले.प्रा.भरत तोपीनकट्टी यांनी संघटनेची माहिती दिली.अनंत लाड यांनी आभार मानले.माजी विद्यार्थी मेळाव्याला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.