बेळगाव शहरातून बंगळुरू अहमदाबाद ही विमान सेवा सुरू केलेल्या स्टार एअर ने बेळगावातून मुंबई विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी 6 सप्टेंबर पासून बेळगाव मुंबई विमान सेवा सुरू होणार असून त्यासाठी बुकिंगची देखील सुरुवात झाली आहे.
सुरुवातीला म्हणजे 6 सप्टेंबर पासून 2449 रुपयांत ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.सध्या बेळगाव मुंबई ही स्पाईस जेट विमानसेवा सुरू आहे सदर विमानसेवा दुपारी आहे आता होणारी स्टार एअर ची विमान सेवा सकाळी लवकर असल्यास याचा फायदा बेळगावकराना होणार आहे.आगामी गणेश उत्सवात स्टार एअर ने मुंबई सुरू करण्याची घोषणा करून बेळगावच्या विमानातून प्रवास करणाऱ्यांना भेट दिली आहे.
स्पाईस जेट तिकीट महागले
पश्चिम महाराष्ट्र आणि बेळगाव मध्ये मुसळधार पावसामुळे बेळगाव शहर जलमय झाले त्यातच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 बंद झाल्याने बेळगाव चा संपर्क कोल्हापूर, पुणे, मुंबई पासून तुटला आहे.
याचा पुरेपूर फायदा उचलत स्पाईस जेट या हवाई वाहतूक कंपनी ने बेळगाव- मुंबई या प्रवास दरात भरमसाठ वाढ केल्याने बेळगावकरणा आर्थिक लुटीचा त्रास सहन करावा लागत आहे .हा एकंदर प्रकार मेलेल्या च्या टाळूवरच लोणी खायचा प्रयत्न असून बेळगावकारांच्या भावना समजून घ्यायला हवा आणि विमानप्रवास दरात कपात करण्याची गरज आहे