एपीएमसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत जुगार सुरू असतानाही कोणतीच कारवाई केली नाही. यामुळे पोलिस आयुक्त बी एस लोकेशकुमार यांनी एपीएमसी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक जे एम कालीमिरची यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
एपीएमसी कार्यक्षेत्रात जुगारी डाव सुरू होता. यावेळी सीइएन विभागाच्या अधिकार्यांनी धाड टाकून जुगाऱ्यांना अटक केली आहे. ही माहिती संबंधित पोलिस स्थानकाला माहिती असूनही त्यांच्यावर कारवाई केली नाही. यामुळे जुगारी व पोलिस अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहेत का? असा सवालही बजावण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीशीत करण्यात आला आहे. त्यामुळे आता एपीएमसीचे पोलीस निरीक्षक चांगलीच अडचणीत येणार, अशी माहिती मिळाली आहे.
पोलीस निरीक्षक कालीमिरची यांनी बेजबाबदारपणा दाखविला आहे. संबंधित पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात जुगारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला असून त्यावर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस निरीक्षकांनी कोणतेच प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे कालीमिरची व जुगारी यांच्यात काही साटेलोटे आहे का? असा सवालही त्यानी नोटीस द्वारे विचारण्यात आला आहे.
येत्या चार ते पाच दिवसात या नोटीस चे उत्तर द्यावे असे पोलीस आयुक्त लोकेशकुमार यांनी बजावण्यात आलेल्या नोटिशीत म्हटले आहे. ही नोटीस बजावण्यात आल्याने पोलीस निरीक्षक कालीमिरची हे चांगलेच अडचणीत येणार अशी शक्यता आहे. या तातडीने बजावलेल्या नोटीशीला उत्तर द्यावे असेही ही सांगण्यात आले आहे.