केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बेळगावला येऊन बेळगाव,विजापूर,बागलकोट आणि आलमट्टी धरणाची हवाई पाहणी केली.या बरोबरच शहा यांनी कोल्हापूर,सांगली,सातारा आणि कोयना धरणाची देखील हवाई पाहणी केली.
या नंतर अमित शहा यांनी ट्विट करून आपल्या हवाई पाहणीची माहिती दिली.दोन्ही राज्य सरकारे आणि केंद्र सरकार पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी कटिबद्ध आहेत असं ट्विट केलंय. या ट्विट ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थॅंक्यु असा रिप्लाय देत पूरग्रस्त दौऱ्याची पाहणी केल्याबद्दल धन्यवाद दिले.
अमित शहा यांनी हवाई पाहणी केल्यावर कर्नाटकाच्या अधिकाऱ्याकडून माहिती घेतली.येडीयुरप्पा यांनी दहा हजार कोटींची मागणी केली पण त्यावर काहीच न बोलता अमित शहा निघून गेले.कर्नाटकचे मुख्यमंत्री,केंद्रीय मंत्री असा लवाजमा पहाणीच्यावेळी होता पण शहा यांनी काही न बोलता प्रयाण केल्यामुळे कर्नाटकला मदत किती मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा संसदीय कामकाज मंत्री प्रहलाद जोशी,रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी,राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे, यांनी एरियल सर्व्हे केला