Sunday, January 5, 2025

/

नमो रुग्ण विरुद्ध मनोरुग्ण

 belgaum

पूरग्रस्त परिस्थिती असताना नुकसानभरपाई घेण्यासाठी नरेंद्र मोदी आणि खासदार सुरेश अंगडी यांचे छायाचित्र असलेले टी-शर्ट घालून आलेल्या शशेतकऱ्यांची सध्या चर्चा आहे. बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या नुकसान भरपाई कार्यक्रमात उपस्थित होते.
एका शेतकऱ्याने त्यांचे माथे भडकवले आणि त्याला चक्क त्यांनी हाकलून लावले. आज दुसऱ्या दिवशी त्यांच्या कृतीबद्दल निषेध म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी या ग्रामपंचायतीच्या विरोधात मोर्चा काढला आणि आंदोलन केले. नमो रुग्ण विरुद्ध मनोरुग्ण अशा पद्धतीचा आंदोलनाचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.

मोदी समर्थक आणि विरोधक असे वातावरण सध्या पाहायला मिळत आहे. मोदी समर्थक काही झाले तरी मोदींना सोडण्यास तयार नाहीत .मात्र त्यांचे टी-शर्ट त्यांचे नाव घेतल्याचे दिसले की त्यांच्या विरोधातील लोकांना मात्र आपला राग सहन करता येत नाही. अशी परिस्थिती आहे. यातूनच या घटना घडत आहेत.

एखाद्याने एखाद्याचे समर्थन करणे किंवा विरोध करणे याचा अधिकार घटनेने त्या व्यक्तीला दिलेला आहे .आणि समर्थन केल्यावरून त्यांच्या विरोधी पक्षात असलेल्या लोकांनी त्याला विरोध करणे कितपत योग्य आहे? पदावर असलेल्या विरोधी पक्षाच्या आमदारांच्या पूत्राला हा अधिकार कोणी दिला? हा प्रश्न सध्या ग्रामीण भागातील जनता विचारत आहे.

पूर स्थितीत अंगावर घालायला कपडे नाहीत अशा वेळी एक टीशर्ट मिळाले त्याच्यावर मोदी चा फोटो होता. टी-शर्ट घालून आला म्हणून विरोध करणारे आमदारांच्या पत्राला विरोध होत आहे. अशावेळी वेळी मिळालेल्या पदाला सांभाळून ठेवण्याचे काम करून त्यांनी शहाणे व्हावे हीच गरज आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.