पूर्व भागात केवळ बळळारी नाल्याचा पुराने हजारो एकर शेती जमीन पाण्याखाली गेली आहे एव्हढेच तर विमान तळा शेजारून जाणाऱ्या ओढा नाला देखील सांबरा येथील शेतकऱ्यांच्या अश्रुंचे कारण बनला आहे हा नाला फुटून शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेलेच शिवाय रस्ता उध्वस्त करून विमान तळाची संरक्षण भिंत देखील या नाल्याने उखडून टाकली आहे. सांबरा विमान तळाची संरक्षक भिंत या पावसाने कोसळली आहे. विमानतळ यंत्रणा या घटनेने खडबडून जागी झाली आहे. विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य या भिंत पडलेल्या ठिकाणी उपस्थित झाले असून पाहणी केली आहे.
अगोदरच शेतकऱ्यांसाठीचा संपर्क रस्ता वाहून गेला आहे. त्यात बाहेरील पावसाचे पाणी विमानतळाच्या आतील भागात घुसत आहे. बाहेरील पाणी असत येत नव्हते तोपर्यंत विमानसेवा सुरळीत होती. आता या सेवेचे काय होणार? हे पाहणी करून ठरवण्यात येत आहे. विमान तळाच्या बाजूच्या संरक्षक भिंतीची अवस्था महाकठीण असून लवकरात लवकर उपाय करावा लागणार आहे.
विमानतळ संरक्षक भिंतीच्या बाजूचा रस्ता खराब झाला होता. अगोदरच या रस्त्याच्या निर्मितीत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून अनेकदा ठिणग्या पडल्या होत्या त्यात हा रस्ताच वाहून गेलाय आता विमान तळाची संरक्षण भिंत देखील वाहून गेली आहे.
ओढा नाला शगनमट्टी सुवर्ण सौध जवळ उगम पावतो मास्तमर्डी शिंदोळी बसरीकट्टी मुतगा शेतीतून सांबरा जातो हा न ओढा नाला फुटून शेतकऱ्यांची शेती संपली आहे.एकूण शेतकऱ्यांची ९०० एकर जमीन पाण्याखाली गेली आहे.
शेतकऱ्यांचे अश्रू सुकून जात आहेत. अशा परिस्थितीत आता विमानतळाच्या आतील रस्ता शेतकऱ्यांना वापरायला द्या अशी विनंती करण्यात आली होती. यावर विचार करू असेही सांगून चालढकल सुरू होती. अशा परिस्थितीत आता विमानतळाला शेतकऱ्यांचे शाप लागले की काय अशी परिस्थिती आहे.