एअर मार्शल एस.के.घोटीया यांनी सांबरा येथील हवाई दल प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन पूरग्रस्त भागात राबविण्यात आलेल्या मोहिमांची माहिती घेतली.यावेळी त्यांनी पुराचा फटका बसलेल्या हवाई दल प्रशिक्षण केंद्राच्या कर्मचाऱ्यांशी बातचीत केली.
पूरग्रस्त भागातील रेस्क्यू ऑपरेशनमध्ये भाग घेतलेल्या वैमानिक आणि हवाई दलाच्या जवानांशी संवाद साधून पूरग्रस्त भागातील मोहिमांची माहिती घेतली.
पूरग्रस्त भागात राबविण्यात आलेल्या यशस्वी मोहिमाबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.सांबरा हवाई दल प्रशिक्षण केंद्रात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.