Monday, February 10, 2025

/

एअर बस पुन्हा बेळगाववरून उडणार

 belgaum

बेळगाव बंगळूर दरम्यान सुरू असलेली A319 ही एअर बस हुबळीला स्थलांतर झाली होती मात्र आता आगामी 1 नोव्हेंबर 2019 पासून पुन्हा बेळगाव वरून सुरू होणार आहे.

बेळगावं बंगळुरू साठी या अगोदर चार दिवस एअर इंडिया तर तीन दिवस अलायन्स एअरवेज ही विमान सेवा सुरू होती मात्र मागील जून पासून ही एअर बस हुबळी ला स्थलांतर झाली होती मात्र नवीन कॅलेंडर नुसार एअर इंडिया ची एअर बस 1 नोव्हेंबर पासून बेळगाव हुन उडणार आहे.

यापूर्वीही बेळगाव येथून सर्व सुविधा हुबळी विमानतळावर हलवण्याचा प्रकार पाहायला मिळाला आहे. एअर बस विमान सेवा सर्व प्रकारच्या कृषी आणि औद्योगिक उत्पादनांच्या वाहतुकीसाठी उपयुक्त ठरते होती पण तीच बंद करून हुबळीला शिफ्ट करण्यात आली होती बेळगाव येथून 95 टक्के प्रतिसाद देऊन सुद्धा विमान कंपन्या बेळगाव पेक्षा हुबळी विमानतळालाच झुकते माप देत होते मात्र एअर बसला हुबळीत म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याने पुन्हा बेळगाव हुन सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.दीड वर्षा पूर्वी स्पाईस जेट ने देखील पाचही विमान उडान चे निमित्त पुढे करून हुबळीला हलवली होती.

आता बेळगाव बंगळुरू एअर बस जुन्या वेळा पत्रका नुसार बेळगावं बंगळूर झेप घेतली

AI585 – Bengaluru – Belgaum (Fri,Sun,Mon,Thu)
Dep – 7.35am , Arrival -8.30

AI586 -Belgaum- Bengaluru (Fri,Sun,Mon,Thu)
Dep – 9.30 , Arrival – 10.30

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.