महानगरपालिका कार्यालय आवारात वकिलांना झालेल्या मारहाण प्रकरणी आज बेळगाव बार असोसिएशनने कामकाजावर बंदी घालून बायकॉट केले.
या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. वकिलांनी काम बंद केल्यामुळे आज न्यायालयीन कामकाज होऊ शकले नाही .काल झालेली घटना आज यामुळे चर्चेला आली.
महानगरपालिका आवारामध्ये ही मारहाण झाली होती. त्यानंतर लगेचच या घटनेचा निषेध वकील वर्गाने केला होता. आज काम बंद पाळून वकिलांनी आपला निषेध आणखी तीव्रतेने व्यक्त केला असून वकिलांवर हात उचलणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे.
मंगळवारी सकाळी वकिलांनी काम बंद आंदोलन करत जिल्हाधिकारी आणि जिल्हा सत्र न्याय यांना निवेदन देत वकिलांना मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली. बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ए जी मूळवाडमठ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. कालच बार असोसिएशनने कुणीही वकिलांनी आरोपीचे वकील पत्र घेऊ नये असे आवाहन केले होते.