Monday, December 23, 2024

/

महापालिकेसमोर वकिलांना मारहाण

 belgaum

जेष्ठ वकील आणि त्यांच्या सहकाऱ्याला तीन व्यक्तींनी मारहाण केल्याची घटना बेळगाव महापालिके समोर घडली आहे.या मारहाणीचा बेळगाव बार असोसिएशनने निषेध केला आहे.

जेष्ठ वकील गिरीश पाटील आणि त्यांचे सहकारी प्रताप सिंह देसाई यांना पालिके समोर धक्काबुक्की केली आहे.याबाबत समजलेल्या माहितीनुसार टेंगिनकेरी गल्लीच्या इनामदार कुटुंबांच्या बाजूनी वकीलपत्र का घेतला असा आरोप करत तिघांनी वकील गिरीश पाटील यांना धक्काबुक्की केली त्यावर त्यांच्या सहकाऱ्यांनी हस्तक्षेप केली असता विजय देसाई यांना देखील धक्काबुक्की केली.

या प्रकरणी मार्केट पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे भोई गल्ली येथील शाहबाज हांचीनमनी,हनिफ हांचीनमनी,जिया हांचीनमनी यांच्या विरोधात आय पी सी 341,323,427,504,506, अनव्ये गुन्हा नोंद झाला आहे.

या मारहाण प्रकरणी बेळगाव बार असोसिएशनची बैठक झाली वकिलांच्या मारहाणीचा निषेध करण्यात आला.बार असोसिएशनचे अध्यक्ष ए जी मूळवाडमठ यांनी आरोपींचे वकील पत्र कुणीही घेऊ नये असे आवाहन केले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.