गोजगा गावात नुकतीच शाळा पडून एक विद्यार्थिनी जखमी झाली ही घटना ताजी असताना जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांनी या शाळेला भेट देऊन विद्यार्थिनीची चौकशी केली आहे. अशा घटना घडू नयेत यासाठी मतदार संघात विशेष मोहीम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मराठी शाळांसाठी झटणाऱ्या जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांनी प्रत्येक नादुरुस्त शाळांना भेट देऊन त्यांची डागडुजी करण्यासाठी सरकारकडे प्रयत्न करणार आहेत.सोमवारी दुपारी जिल्हा पंचायत शिक्षण स्थायी समिती अध्यक्ष रमेश गोरल आणि सी आर पी अधिकाऱ्यांना देखील पहाणी केली गोरल यांनी तातडीने चार लाखांचा निधी मंजूर करून देतो आताच दुरुस्तीचे काम हाती घेऊ असे आश्वासन दिले मात्र ग्रामस्थांनी डागडुजी काम नको पूर्ण शाळा इमारत नवी बांधा अशी मागणी केली त्यावर प्रस्ताव पाठवून काम करू असे सांगितले शाळा दुरुस्त करण्यासाठी लवकरच आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सरस्वती पाटील यांनी सर्वसाधारण सभेत आणि शिक्षणाधिकाऱ्यांना सरकारी मराठी शाळांमध्ये ते ज्या त्रुटी आहेत त्या दाखवून दिल्या होत्या. मात्र या मागील दोन वर्षात त्यांनी केवळ दहा हजार रुपये दिल्यामुळे कोणत्याही शाळेची दुरुस्ती झाली नाही. हा प्रकार निंदनीय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गोजगा येथे भेट देऊन याबाबत तातडीने निर्णय घेऊ असेही त्यांनी सांगितले आहे.
मन्नूर गोजगा आदी परिसरात शाळांची परिस्थिती बाबत जिल्हा परिषद सदस्य सरस्वती पाटील यांनी आवाज उठविला होता. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे या शाळांचे पडझड झाली आहे. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत असून या शाळांना ताबडतोब दुरुस्ती करावी आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य करावे अशी मागणी होत आहे.सरस्वती पाटील यांनी पहाणी करून अनेक अधिकाऱ्यांना धारेवर झाले आहे त्यामुळे ही कामे लवकरात लवकर करावी अशी मागणी अधिकाऱ्यांनी करण्यात आली.