Monday, December 30, 2024

/

अतुल शिरोळेची कोरियातील जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड

 belgaum

मुचंडी(ता. बेळगाव) गावचा आतंरराष्ट्रीय कुस्तीपट्टू याची दक्षिण कोरिया येथील चिंग्जू येथे जागतिक मार्शल आर्टस् कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.आगामी 2 ते 7 सप्टेंबर दरम्यान दक्षिण कोरिया येथे ही स्पर्धा होणार आहे.

दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेत त्याची भारतीय संघात निवड झाली असून 86 किलो वजन गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात भाग घेणार आहे.मागील महिन्यात नवी दिल्ली येथील त्यागराज स्टेडियम मध्ये झालेल्या निवड चाचणीत उत्तर भारतातील तीन मल्लाना पराभूत केल्याने त्याची निवड झाली आहे. त्याने या स्पर्धेत मेडल जिंकल्यास आशियाई क्रीडा स्पर्धेला पात्र ठरणार आहे.

अतुल

याधीही अतुलने २०१६ मधे जॉर्जिया (रशिया) येथे झालेल्या आतंरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कास्यपदक मिळविले आहे, २०१७ मधे तुर्कस्तान येथील स्पर्धेत पाचवा क्रमांक लागला होता गेल्या काही महिन्यांपूर्वी सातारा(कराड-उंब्रज) येथील कुस्तीत त्याने उमेश्वरी किताब चांदीचा गदा व पारितोषक व आर पी डी कॉलेज मधून खेळताना युनिव्हर्सिटी ब्लु ‘किताब देखील पटकावला होता.

पैलवान अतुल शिरोळे हा मुचंडी येथील मध्यमवर्गीय गरीब कुटुंबातुन येत मागील आंतरराष्ट्रीय दौऱ्यात अनेक सामाजिक संस्थांनी त्याला आर्थिक मदत केली होती यावेळी त्याला एक लाख रुपये खर्च असून सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत आर्थिक मदत करण्याची गरज आहे.

ATul shiroleमुचंडी सारख्या खेड्यात जन्म घेऊन कुस्ती मध्ये ऑलम्पिक मेडल जिंकण्याचा ध्येय उराशी बाळगलेल्या या तरुणास कोरियन स्पर्धेत सहभागी होण्यास सढळ हस्ते आर्थिक मदत करावी असं आवाहन बेळगाव live करत आहे . तुमची एक मदत.. देशाच नाव करेल.. कारण अतुल मध्ये ती धमक आहे.

संपर्क -अतुल शिरोळे
मोबाइल-8861169217

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.