सुनेचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून सासऱ्याने सुनेच्या मानेवर कोयत्याने वार करून खून केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील काकती पोलीस स्थानक कार्यक्षेत्रात घडली आहे.मंगळवारी सायंकाळी ही घटना काकती जवळील सोनट्टी गावात घडली असून या घटने नंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कलावती सिद्राय मुचंडी वय 25 रा. सोनट्टी असे खून झालेल्या सुनेचे नाव आहे. कलावतीचे माहेर न्यु गांधी नगर होते तिचा सासरा असणाऱ्या सिद्धप्पा मुचंडी वय 64 रा.सोनट्टी याने यापूर्वी ही आपल्या सुनेशी वेगवेगळ्या कारणांमुळे वाद घातला होता दोघांत अनेकदा खटके उडतच होते तिचे दुसऱ्या सोबत अनैतिक संबंध असल्याचाआरोपही केला होता.
मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास भर रस्त्यात सून कलावती आणि सासरा सिद्धप्पा यांच्यात जोरदार वाद झाला त्यानंतर सिद्धप्पा यांने कलावतीच्या मानेवर कोयत्याने सपासप वार केले त्यात तिचा मृत्यू झाला.काकती पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.ए सी पी भालचंद्र आणि पोलीस निरीक्षक श्रीशैल कौजलगी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. काकती पोलीस पुढील तपास करत आहेत.
गेल्या चार दिवसां पूर्वी अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीचा खून केला होता आठवडा भरातील बेळगाव तालुक्यातील ही दुसरी घटना आहे .सध्या या परिसरात अशा दोन घटना घडल्या आहेत त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ही भीती घालवण्यासाठी पोलीस प्रशासन कोणती भूमिका बजावणार असा प्रश्न निर्माण होत आहे.