देशात पहिलेंदाच आयोजित करण्यात आलेल्या सैन्यदलाच्या महिला पोलीस रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून बेळगावमध्ये दि.१ ते ५ ऑगस्ट दरम्यान मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या शिवाजी स्टेडियमवर भरतीची प्रक्रिया होणार आहे.
एकूण पंधरा हजारहून अधिक अर्ज सैन्यातील महिला पोलीस पदासाठी आले होते.दहावीच्या गुणांच्या आधारावर छाननी करून तीन हजार उमेदवारांची शारीरिक चाचणीसाठी निवड करण्यात आली आहे. महिला सैन्य भरतीसाठी शिवाजी स्टेडियमवर तयारी करण्यात आली आहे.
बंगलोरहून लष्करी अधिकारी या भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बेळगावात दाखल झाले आहेत.कर्नाटक,तामिळनाडू,आंध्र प्रदेश,केरळ,अंदमान निकोबार येथील उमेदवारांसाठी या भरती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.देशात एकूण पाच ठिकाणी ही भरती प्रक्रिया केली जाणार आहे.देशभरात 100 जागा भरणार आहेत.
बुधवारी सकाळी बेळगावातील मराठा रेजिमेंट मधील शिवाजी स्टेडियम मध्ये मिलिटरी भर्ती अधिकारी ब्रिगेडियर दिपेंद्र रावत यांनी भर्ती प्रक्रिये बद्दल माहिती दिली.