बाजूने जाणाऱ्या एका दुचाकीचा हँडल दुसऱ्या दुचाकीला लागल्याने दुचाकी पडून झालेल्या अपघातात आई ठार तर मुलगा किरकोळ जखमी झाला आहे.
मंगळवारी दुपारी खानापूर रोड कॅम्प हनुमान पुतळ्यासमोर घडली. सरिता राजेंद्र मंडपाळकर वय (39)अयोध्या नगर टिळकवाडी दुचाकीवरून पडून ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
रहदारी दक्षिण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत महिला आपल्या मुलाच्या दुचाकीवरून मागे बसून ग्लोब कडून चन्नम्मा चौकाकडे जात होती त्यावेळी बाजूने जाणाऱ्या अज्ञात दुचाकीचा हँडल त्यांच्या दुचाकीला लागल्याने गाडीवरून पडल्या त्यात त्यांच्या डोकीला गंभीर दुखापत झाली त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर गाडी चालवणारा त्यांचा मुलगा सचिन राजेंद्र मंडपाळकर वय 21 हा किरकोळ जखमी झाला आहे.
दुसऱ्या अज्ञात दूचाकीवर गुन्हा नोंद झाला असून हँडल लागलेली ती दुसरी दुचाकी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.या प्रकरणी दक्षिण पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.बेळगाव खानापूर रोड अपघाताचें जाळे बनला असून या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची संख्या वाढली आहे.