गेल्या दोन दिवसांपासून सतत होत असलेल्या पावसामुळे बुधवारी सुट्टी जाहीर झाली आहे.बुधवार 31 जुलै रोजी बेळगाव आणि खानापूर,बैलहोंगल आणि कित्तुर तालुक्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांनी अति वृष्टीमुळे एक दिवस शाळांना सुट्टी देण्याचा आदेश बजावला आहे.खानापूर बेळगावं मधील परिस्थिती पाहता शिक्षण खात्याने दोन दिवस सुट्टी द्या अशी विनंती केली होती मात्र जिल्हाधिकारी यांनी बुधवार एकच दिवस सर्व शाळाना सुट्टी दिली आहे.खानापूर सह बेळगाव तालुक्यात वातावरण जलमय झालेले असले तरी मंगळवारी जिल्हा प्रशासनाने सुट्टीचा निर्णय घेतला नव्हता यासाठी जिल्हा पंचायतीचे शिक्षण स्थायी समिती सदस्य रमेश गोरल यांनी या संदर्भात पाठपुरावा केला होता
तालुक्यात नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेला जाण्यासाठी योग्य व्यवस्था नाही अशा परिस्थितीत सुट्टी देणे आवश्यक आहे, ही गरज निर्माण झाल्यानंतर रमेश गोरल यांनी तातडीने गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याशी बातचीत केली संबंधित अधिकाऱ्यांनी सुट्टी देण्याची विनंती केली होती त्यानुसार जिल्हाशिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुट्टी साठी विनंती केली होती.पावसाचा जोर वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांवर कोणतेही संकट ओढवू नये म्हणून सुट्टी देणे गरजेचे होते विशेषतः खानापूर सारख्या जंगलमय आणि अतिपावसाच्या प्रदेशात दोन दिवस सुट्टी देण्याची गरज निर्माण झाली होती पण आता बुधवार एक दिवस सुट्टी जाहीर झाली आहे.