बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाची पाणी पातळी वाढली असून जलाशय ओव्हरफ्लो होण्यासाठी केवळ दीड फूट बाकी आहे. गेल्या दोन दिवसांपासून तिलारी राकसकोप धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसामुळे पाणी पातळी वाढली असून डॅम ओव्हर फ्लो च्या उंबरठ्यावर आहे.
जलाशय पूर्ण भरण्यासाठी 2478 फूट पाणी लागते. सोमवारी दुपारी बारा वाजता धरणात 2476.10 फूट पाणी जमा झाले आहे. तासा तासांनी हा आकडा वाढत असून असाच पाऊस पडल्यास मंगळवारी डॅम ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.
पाणी पुरवठा खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राकसकोप जलाशयात सध्या 21 फूट पाणी भरले आहे असून गेल्या दीड महिन्यात या भागात 1203 मीमी पाऊस झाला आहे.या भागात पावसाची संततधार अशीच सुरू राहिल्यास मंगळवारी धरण भरेल किंवा कमी पाऊस झाल्यास दोन दिवस अधिक लागतील.धरण भरण्याच्या उंबरठ्यावर आल्याने लवकरच गंगापूजन देखील होणार आहे.
रविवार दि 7 रोजी जलाशय परिसरात 16.6 मीमी पाऊस झाला होता त्यामुळे सोमवार दि 8 रोजी पाणी पातळी 2458.30 फूट इतकी होती.त्याचदिवशी सायंकाळी 2459.50 ची नोंद झाली होती. जून महिन्याच्या अखेरीस 2444.35 फूट इतकी नोंद होती. सध्या पाऊस जोर सुरू असल्याने फक्त दीड फुटाची गरज असून त्यानंतर बेळगावचा पाणीप्रश्न सुटणार आहे.
न्यूज अपडेट-रामलिंग पाटील तुडिये