भर उन्हात अनेक ठिकाणी पाणी गळती होऊन लाखो लिटर पाणी वाया गेलेच आहे आता पावसात देखील तीच स्थिती असून पाणी गळतीच्या घटना होतंच आहेत. पाणी आडवा पाणी जिरवा यासारख्या अनेक पाणी बचतीच्या योजना सरकार राबवत असताना बेळगावची महा पालिका पाणी पुरवठा महामंडळ कधी सुधारणार हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
महात्मा फुले रोडवर पाईप घालण्याचे आणि दुरुस्तीचे काम सुरू असून पाईप खोलून व्हॉल्व न बसवता कामगार तसेच निघून गेल्यामुळे त्या भागात पाणी सोडल्यावर व्हॉल्व नसलेल्या ठिकाणाहून हजारो लिटर पाणी वाहून वाया गेले.गुरुवारी पाचच्या दरम्यान हा प्रकार घडला होता.
पाण्याचा लोंढा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहत होता.त्यामुळे वाहतुकीची कोंडी देखील तेथे निर्माण झाली होती.ऐन पावसाळ्यात सगळीकडे रस्ते आणि पाईप लाईनचे काम सुरू असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.शिवाय पाणी हजारो लिटर वाहून गेले आहे त्यामुळे महापालिकेला किंवा पाणी पुरवठा महा मंडळाला कधी अक्कल येणार हा प्रश्न जनतेच्या तोंडून ऐकायला मिळत होता.