वर्दीच्या रिक्षाचालकांनी पुकारलेल्या बंद बाबत रिक्षावाले, कमिशनर आणि पालकमंत्री यांच्यातील तोडगा काढण्याची बैठक अपयशी ठरली आहे.
बैठकीत तोडगा न निघाल्याने काही ऑटो चालकांनी अजून दोन दिवस बंद पाळायचा दोन दिवसांचा अलटीमेटम देऊन तिप्पट दर घ्यायचा निर्णय घेतला तर काहींना सहा तर सहा मुले घेऊ मात्र सध्या घेत असलेल्या दराच्या तिप्पट दर पालकांकडून स्वीकारू असे प्रशासना सोबत झालेल्या बैठकी नंतर एक बैठक झाली त्यात हवं दोन प्रवाह दिसून आले आहेत.
प्रशासना सोबत झालेली बैठकी वेळी रिक्षावाल्यांनी आपली भूमिका मांडून सहा मुले घेऊन तितकाच दर स्वीकारणे परवडत नसल्याचे सांगितले, पण प्रशासन कायदेशीर बाबींवर असून बसल्याने आमचाही नाईलाज होत असून ६०० दर घेत असलेल्या ठिकाणी १८०० रुपये घेणे भाग आहे. असे रिक्षाचालकांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
अजूनही प्रशासनाला दोन दिवस वेळ देतो. त्यांनी जास्त मुले घेण्याची परवानगी द्यावी अन्यथा आम्हाला जास्त दर स्वीकारावा लागेल असा इशारा रिक्षावाल्यांनी दिला आहे. या आंदोलनात पालकांनीही सहभाग घ्यावा डी सी यांच्या समोर आपली समस्या मांडावी असेही काही रिक्षा चालकांचे म्हणणे आहे.
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही अपयश आले. नियम मोडून रिक्षाचालकांना परवानगी देणे प्रशासनाला अडचणीचे ठरत असल्याने आता पालकांना भुर्दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे रिक्षा चालकांच्या आजच्या बैठकी नंतर अजूनही गोंधळाची स्थिती आहे त्यामुळे वर्दीचे रिक्षा कधी सुरू होतील याकडे लक्ष लागून राहिले आहे.