गेल्या आठवडा भरा पासून सुरू असलेल्या वर्दीच्या रिक्षा चालकांनी अखेर आपला संप मागे घेतला असून उद्या शुक्रवारी सकाळी पासून वर्दीच्या रिक्षा सुरू होणार आहेत. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून आपल्या पाल्यांना स्वता शाळेत सोडणाऱ्या पालकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
गेल्या 28 जून पासून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्षाचालकासह एकूण 6 विद्यार्थीच वर्दीच्या रिक्षात प्रवास केला पाहिजे हे सांगून पोलीस प्रशासनाने कारवाईचा धडाका लावला होता केवळ सहा विद्यार्थी परवडत नाही म्हणून ऑटो चालकांनी संप पुकारला होता.गेले आठवडा भर रिक्षा संघटना पालक संघटनानी पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटी गाठी घेणे, डी सी ऑफिस समोर आंदोलन करणे असे अनेक प्रयत्न केले होते मात्र यातून तोडगा निघत नव्हता मात्र 6 ते 8 विद्यार्थ्यांवर एकमत झाले आहेत त्यामुळे शुक्रवारी पासून रिक्षा सुरू होतील संप मागे घेतला असल्याचे रिक्षा संघटनेने जाहीर केलं आहे.
ऑटो चालक 14 जुलै पर्यंत 6 ते 8 विद्यार्थ्यांना घेऊन वर्दी करू शकतात यावर एकमत झाले आहे पालकांनी पूर्वी पेक्षा अधिक रक्कम वाढीव देण्याचे आहे.14 जुलै रोजी हायकोर्टाच्या येणाऱ्या निकाला पर्यंत 6 ते 8 विद्यार्थी प्रवास करतील त्यानंतर यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे ऑटो चालकांचे म्हणणे आहे. उद्या पासून 6 ते 8 विद्यार्थी वर ऑटो सुरू होतील अशी माहिती रिक्षा असोसिएशनच्या प्रमुखांनी दिली आहे.
पोलीस आयुक्त म्हणतात केवळ सहाची परवानगी-रिक्षा चालक दिशाभूल करताहेत
उद्या पासून वर्दीची होणार गर्दी आणि रिक्षा संप मागे असे सांगून रिक्षाचालकांनी आम्हाला पोलीस प्रशासनाने आठ विद्यार्थी घेऊन जाण्याची परवानगी मिळाली असे जाहीर केले होते. पण आम्ही अशी कोणतीही सूचना केली नसून 6 पेक्षा जास्त विद्यार्थी सापडल्यास कारवाई होईल असे पोलीस आयुक्तांनी प्रसिद्धी पत्रकान्वये स्पष्ट केले आहे.
काही ऑटो चालक पोलीस आयुक्तांनी 8 विध्यार्थ्यांची परवानगी मिळाली असे असे सांगुन पालकांची दिशाभूल करत आहेत बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयातून असा कोणताही आदेश काढलेला नाही असे स्पष्टीकरण पोलीस आयुक्त बी एस लोकेशकुमार यांनी दिला आहे.
सहा हुन अधिक विद्यार्थी भरलेल्या रिक्षावर कारवाई केली जाईल असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे हित जोपासत 28 जून पासून अधिक विद्यार्थ्यांची ने आण करणाऱ्या ऑटो विरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू केली आहे याला विरोध करत शहरातील वर्दीच्या ऑटो चालकांनी बंद चा संप उगारला आहे. सदर वर्दीचे रिक्षा पूर्ववत होण्यासाठी कमीत कमी रिक्षातून 8 विद्यार्थ्यांना ने आण करण्याची परवानगी मिळावी यासाठी ऑटो चालक संघटना पालकांनी पोलिसांच्या भेटी घेतल्या आहेत याची मागणी सुरू केली आहे.मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहाहुन अधिक विद्यार्थ्यांची ने आण करण्याची परवानगी देणार नाही सहा पेक्षा अधिक विद्यार्थी ने आण करणाऱ्या वर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केलं आहे.