बेळगाव बार असोसिएशनच्या अकरा जागांसाठी बुधवारी दिवस भर वकिलांनी अगदी चुरशीने मतदान केले.एकूण 1865 पैकी 1532 वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला.
बुधवारी सकाळी पासूनच वकिलांनी बार असोसिएशनच्या कार्यालयात मतदानासाठी गर्दी केली होती अध्यक्ष उपाध्यक्ष जॉईंट सेक्रेटरी सह एकूण 11 जागांकरिता 38 जण रिंगणात आहेत.सकाळी 10:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत नवीन कोर्टाच्या बाजूवरील बार असोसिएशनच्या कार्यालयात मतदान प्रक्रिया पार पडली.
सहा वाजल्या नंतर मतमोजणी प्रक्रिया प्रारंभ होणार असून रात्री 9 पर्यंत निकाल अपेक्षित आहे.अध्यक्ष पदासाठी चौघे जण रिंगणात आहेत.बॅलेट पेपर द्वारा हे मतदान घेण्यात आले असून निकाल लवकर लावण्यासाठी वेगवेगळ्या पदा साठी वेगवेगळ्या रंगांचे ब्लेट पेपर वापरण्यात आले होते या शिवाय वेगवेगळ्या रंगाच्या मत पत्रिका करीता त्या त्या रंगाचे मत पेट्या बनवल्या होत्या.
बार असोसिएशन कार्यालया समोर मार्केट पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असून चार हुन अधिक सी सी टी व्ही बसवण्यात आल्या आहेत.पावसाची शक्यता असल्याने वकिलांना प्रचारासाठी पेंडाल व्यवस्था करण्यात आली होती. वकील रमेश मिरजकर यांनी निवडणूक अधिकारी काम पाहिले.