कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षित पणामुळे बेनकनहळळी ग्राम पंचायतीसमोरील राष्ट्र ध्वज रात्री साडे आठ पर्यंत फडकत होता.या ग्राम पंचायतीने राष्ट्र ध्वजाचा अपमान केला आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राष्ट्रध्वज निती संहिते नुसार कोणत्याही शासकीय कार्यालयावरील ध्वज सूर्यास्त व्हायच्या अगोदर काढणे गरजेचे असते मात्र या बेनकनहळळी ग्राम पंचायती वरील राष्ट्र ध्वज शनिवारी रात्री साडे आठ पर्यंत तसाच होता. याबाबत पंचायतीच्या कर्मचाऱ्यांना गांभीर्य नाही का हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
काही वरिष्ठ सदस्यांच्या ध्यानात ही बाब येताच अखेर रात्री साडे आठ वाजता हा ध्वज उतरवण्यात आला आहे रात्री उशीर पर्यंत राष्ट्र ध्वज फडकवायला जबाबदार अधिकारी पी डी ओ यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.