कर्नाटक राज्य परिवहनच्या वाहकाने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.
बस डेपोतच वाहकाने आत्महत्या केली होती.खात्यातील दोन अधिकाऱ्यांनी मानसिक त्रास दिल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे वाहकाने सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले होते.आत्महत्या केलेल्या वाहकाचे नाव आनंद हरिजन(५३) रा.केदनूर असे आहे.
आत्महत्येची घटना कळल्यावर त्याचे नातेवाईक आणि दलित संघटनांचे कार्यकर्ते जमा झाले.त्यांनी संबंधित अधिकाऱ्या विरुद्ध कारवाई केल्याशिवाय मृतदेह हलवणार नाही अशी भूमिका घेतली. सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत बस स्थानकात मृतदेह ठेवून त्यांनी ठिय्या मांडला होता.आमदार अनिल बेनके यांनी देखील आंदोलनस्थळी भेट दिली.नंतर त्याच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या दोघां वायव्य कर्नाटक राज्य परिवाहन विभाग(के एस आर टी सी) अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
दुपारी एक वाजता दोघा अधिकाऱ्यांना निलंबित केल्यावर नातेवाईकानीं आंदोलन मागे घेत मृतदेहावर अंतिम संस्कार केला.
सहाययक रहदारी नियंत्रण अधीक्षक एस एम मुल्ला आणि डेपो मॅनेजर एल एस लाठी अशी निलंबित अधिकाऱ्यांची नावे आहेत या प्रकरणी मार्केट पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.