[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
बेळगाव जवळ असलेल्या अरगन तलाव परिसरात मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या जवानांनी वृक्षारोपण केले. मागील वर्षी तलावाचे संपूर्ण गाळ काढून पुनरुज्जीवन करण्यात आले होते या पुनरुज्जीवित पाच तलावांच्या आसपास बाराशे वृक्ष लावण्यात आले आहेत.
शनिवारी सकाळी हा उपक्रम राबवण्यात आला. तलावाच्या आजूबाजूने हरित संरक्षक तयार व्हावेत अशा प्रकारची झाडे लावण्यात आली असून जास्तीत जास्त पक्षांना या ठिकाणी येऊन बसण्याची आणि घरटी बांधण्याची सोय व्हावी अशा वृक्षांची निवड करण्यात आली आहे.
मागील दोन वर्षांपासून स्वच्छता करून या तलावांना सुंदर स्वरूप देण्यात आले होते. यंदा मान्सूनमध्ये हे सारे तलाव भरून गेले आहेत. डेप्युटी कमांडंट ब्रिगेडियर मोहन पत्तार ,वन अधिकारी एम व्ही अमरनाथ, एसीएफ एस एम संगोळी यांच्या उपस्थितीत तेराशे हुन अधिक जवानांनी या उपक्रमांमध्ये सहभाग घेतला होता .
पेरू लिंबू बांबू या प्रकारची झाडे कर्नाटक राज्य वनविभागाकडून आणून लावण्यात आली असून काही मध्ये नारळ आणि फुलांच्या झाडांचा समावेश आहे.