लहान पिशवीत नवजात बलिकेला सोडून दिल्याचा प्रकार बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटल परिसरात रविवारी रात्री 9.30 च्या सुमारास उघडकीस आला होता.
केवळ 3 ते 4 दिवसांच्या या नवजात बालिकेला दोन टी शर्ट मध्ये बांधून एक पिशवीत घालण्यात आले होते. सुरक्षा रक्षकाला हे समजल्यानंतर त्याने आपल्या वरिष्ठांना कळविले त्या नंतर हॉस्पिटल प्रशासनाने त्या नवजात बलिकेचा ताबा घेतला लागलीच त्या बालिकेवर उपचार सुरू केले .
या प्रकरणी एपीएमसी पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. मुलगी जन्मली म्हणून तिला सोडून देण्यात आले आहे या बाबत सी सी टी व्ही फुटेज तपासले जात असून त्या बलिकेला कुणी सोडलंय याचा तपास केला जात आहे.तीन दिवसांपूर्वी कोणत्या तरी खाजगी इस्पितळात जन्म दिलेलं ही बालिका असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे