अचानक गोठ्याला लागलेल्या आगीत तीन जनावरे होरपळून मृत्युमुखी पडल्याची घटना बेळगाव तालुक्यातील हलगा येथे घडली आहे.
रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून आगीत दोन मोठ्या म्हशी आणि एक गाय जळून मृत्युमुखी पडली आहे. याघटनेत दोन लाखांचे नुकसान झाले आहे.
याबाबत समजलेल्या अधिक माहिती नुसार हलगा मरगाइ गल्ली येथील प्रकाश संताजी यांच्या मालकीच्या गोठ्याला आग लागली त्यात ही जनावरे दगावली आहेत.संताजी यांच्या राहत्या घराच्या मागे जनावरांचा गोठा आहे गोठ्यात करेंटची देखील सोय नाही त्यामुळे शॉर्ट सर्किटचा प्रश्न देखील उदभवत नाही.आगीची घटना कशी घडली याचा तपास पोलीस करत आहेत.
सोमवारी सकाळी हलगा तलाठी आणि हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.