बेळगाव शहरात सर्वसामान्य नागरिकांची घरे सुरक्षित नाहीत यात काहीच नवीन नाही. पण आता पोलीस अधिकारी आणि सरकारी अधिकारी यांचीही घरे सुरक्षित नाहीत, असे म्हणावे लागते आहे. कारण तशी घटनाच घडली असून एक पोलीस अधिकारी व जिल्हा पंचायत सीईओ च्या घरात चोरी झाली आहे.
बेळगाव शहरात काम केलेले व सध्या पोलीस निरीक्षक पद सांभाळणारे अधिकारी ए एस गुदीगोप्प आणि बागलकोट जिल्हा पंचायतीचे सीईओ यांच्या हनुमान नगर घरी ही चोरी झाली आहे.
आज सकाळी या चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पोलीस अधिकारी आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तुळात यामुळे खळबळ माजली आहे.अजून या दोन्ही चोरीत किती माल लंपास करण्यात आला आहे. याची माहिती मिळू शकलेली नाही.