शिक्षणाचा मार्ग पत्करणे तितकेसे सोपे राहिलेले नाही. खानापूर तालुक्यातील जंगल भागात असलेल्या चापोली, कापोली मुदगई आणि आजूबाजूच्या खेड्यातील विद्यार्थ्यांची ही परिस्थिती आहे.जंगली भागातून स्वतःचा जीव धोक्यात घालून शाळेला जाण्यासाठी दररोज 24 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागत आहे .
चिखलातून वाट काढत आणि पावसाला तोंड देत हे विद्यार्थी शिक्षणाचा प्रवास करत आहेत. चांगले रस्ते वीज पुरवठा आणि शिक्षण व आरोग्य सुविधा आमच्या गावातच द्या अशी मागणी या गावातील लोकांनी अनेक वर्षापासून केली आहे .मात्र ती मागणी अजून पूर्ण झालेले नाही .त्यामुळे गावात आणि समस्या आहेतच मात्र प्रामुख्याने लहान मुलांना शिक्षणासाठी बाहेर जावे लागत आहे.
त्या भागातील लोकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांना आश्वासने दाखवण्यात आली पण ती पूर्ण केली गेलेली नाहीत. अतिशय खराब रस्त्यामुळे चापोली गावाची परिस्थिती बिकट आहे. कर्नाटक परिवहन मंडळाची बस सुद्धा या गावाला जात नाही.
त्या गावात पहिली ते पाचवीपर्यंत शाळा आहे. सहावी ते दहावी साठी 12 किलोमीटर चालून जांबोटी ला जावे लागते. बसची सुविधा नसल्यामुळे सायकल घेऊन जाणे अवघड आहे .कारण चिखलाचा रस्ता आहे, त्यामुळे चालण्याशिवाय दुसरा पर्याय त्या विद्यार्थ्यांसमोर नसतो.नुसती आश्वासने देण्यापेक्षा या गावांचा सर्वांगीण विकास करण्याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे.