बेळगाव येथील पाटील गल्ली येथील व्ही किड्स कॉन्सेप्ट स्कुलने आपल्या माय माऊलींचे पूजन करून गुरुपौर्णिमा साजरी करण्याचा आदर्श विद्यार्थ्यांना घालून दिला.
विद्यार्थ्यांनी आपल्या मतांचे चरण स्पर्श करून अंगठ्यास गंध लावून फुले वाहून पाद्यपूजा केली.
शिक्षिका स्नेहल श्रीहर्षा, शिक्षक आनंद चौगुले यांनाही पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला.
विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आई हा आपला पहिला गुरू असतो त्यामुळे पहिल्यांदा त्या माऊलीला वंदन करण्याची पद्धत शिकविण्यात आल्यामुळे पालकवर्गाने आनंद व्यक्त केला. मिठाई वाटून सांगता झाली.