राज्य परिवहन मंडळाच्या वतीने (के एस आर टी सीच्या )वतीने कॉलेज विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या बस पास त्वरित वितरित करा अशी मागणी करत सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने केली.
परिवाहन खात्याकडून बस पास देण्यास विलंब करण्यात येत आहे असा आरोप संतप्त विद्यार्थीनींनी आंदोलन केले गेल्या महिन्यातच बस पाससाठी परिवार खात्याकडून पैसे भरून घेण्यात आले आहेत मात्र अद्याप त्यांनी आम्हाला बस पासेस दिल्या नाहीत अशी तक्रार देखील या विद्यार्थीनींनी केली.
कॉलेज सुरू होऊन जुलै महिना देखील संपायला आलाआहे मात्र पासेस मिळाल्या नाहीत दररोज ये जा करण्यासाठी खिशातून पैसे घालावे लागत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची ओढातून होत आहे याच उत्तर परिवाहन खात्याने ध्यावे असेही म्हटले आहे. या बाबतीत परिवाहन खात्याला संपर्क केला असता उडवा उडवीची उत्तर मिळत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी परिवाहन खात्याला संपर्क करून त्वरित बस पास वितरित करा अश्या सूचना दिल्या.