सार्वजनिक वाचनालय या संस्थेच्या वतीने राजेश्री शाहू छत्रपती महाराज जयंती आज साजरी करण्यात आली. बेळगाव शहर आणि तालुक्यातील मराठी माध्यम शाळांतून प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1000 रु रोख आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले
बेळगाव शहरात प्रथम आलेल्या मराठी विद्या निकेतनच्या प्रगती विजय पाटील आणि तालुक्यात प्रथम आलेल्या महाराष्ट्र हायस्कूल च्या वैष्णवी मंगनाईक याना प्रत्येकी 5000 रोख देवून तर इतर 52 विद्यार्थ्यांना 1000 रुपये प्रमुख पाहुणे प्रसाद कुलकर्णी, इचलकरंजी यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले अध्यक्ष स्थानी वाचनालयाच्या अध्यक्ष सुनीता मोहिते या होत्या.
‘राजश्री शाहू महाराजांनी आपल्या काळात शिक्षणला महत्त्व दिले, शेत जमिनीचा कस वाढविला, सुमारे 102 वर्षपूर्वी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या साठी राखीवतेचा कायदा केला आणि सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला, विविध जातीसाठी वसतिगृहे सुरु केली, अनेक शिक्षण संस्था दत्तक घेऊन कार्य केले’असे विचार यावेळी बोलताना प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले वाचनालयाचे सचिव नागेश सातेरी यांनी स्वागत केले उपाध्यक्ष कृष्णा शहापुरकार यांनी आभार मानले.
जगाने हे सिद्ध केले आहे की, मातृभाषेतून दिलेले शिक्षण हे अधिक महत्त्वाचे आहे जगात सर्वत्र जी माणसे मोठी झाली आहेत ती सर्व मातृभाषेतून शिक्षण घेतलेली आहेत या दृष्टीने सार्वजनिक वाचनालयाने घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले.