शून्य फौंडेशन च्या किरण निप्पाणीकर यांनी पडलेले एक झाड पुन्हा उभे करून एक आदर्श काम केले आहे.कालच्या पावसात मंडोळी रोडवर एक झाड पडले होते. हे 24 तासांच्या आत वॅक्सिन डेपो भागात पुन्हा लावण्यात आले.
सेंट पॉल्स शाळेच्या 1993 च्या बॅच च्या माजी विद्यार्थ्यांनी यासाठी मदत केली.100 वर्ष जुने हे झाड आता आणखी 100 वर्षे नक्कीच जगेल ही आशा आहे. यापूर्वी झाडे तोडण्यापेक्षा ती एक ठिकाणावरून दुसरीकडे नेऊन लावण्याचा प्रयत्न किरण।निपाणीकर यांनी केला व पहिलाच प्रयोग यशस्वी झाला होता.
आता मुळापासून उमळुन पडलेले हे झाड पुन्हा उभे करून त्याला त्यांनी जीवदान दिले आहे.बॉकसाइट रोड वरील रस्ता दुपदरी करणार आलेली अनेक झाडे पिरनवाडी येथील तलावात लावण्यात आली होती त्या नंतर बेळगावात अशी अनेक झाडे वाचवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे