हेस्कॉमने गणेश उत्सव सुरू होण्यापूर्वी शहरात रस्ते दुरुस्तीसाठी काढलेले खड्डे बुझवावेत गणेश मंडळांना घरघुती दर आकारावा आणि पथ दीप हायमास्ट दुरुस्ती करा अश्या मागण्या शहापूर विभाग गणेश महामंडळान हेस्कॉमकडे निवेदन देत केली आहे.शनिवारी सकाळी शहापूर गणेश महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हेस्कॉम अधिकारीअप्पनावर यांची भेट घेऊन अश्या आशयाचे निवेदन सादर केलं.
शहरात रस्ते अंडर ग्राऊंड केबल दुरुस्तीसाठी अनेक ठिकाणी खुदाई करण्यात आली आहे सदर खड्डेबजावण्यासाठी महापालिका हेस्कॉम कडे बोट करत आली आहे त्यामुळे गणेश उत्सव सुरू व्हायच्या आत हेस्कॉम खड्डे बुजवून द्यावे गणेश उत्सव सुरू व्हायच्या आत पथदिप दुरुस्त करावे या शिवाय उत्सव काळात 24 तास विद्युत पुरवठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी देखील केली आहे.
गणेश मंडळाना कमर्शियल दर लावू नका कारण मंडळ व्यापार करत नाही किंवा गणेश उत्सवात पैसे कमवत नाहीत त्यामुळे हेस्कॉम कडून लावला जाणारा कमर्शियल दर अन्यायकारक आहे त्या ऐवजी घरघुती दर लावा अशी मागणी केली आहे. उत्सवात मीटर बसवते वेळी रिडींग सांगण्यात येत नाही त्यामुळे मंडळाचे कार्यकर्ते आणि हेस्कॉम अधिकाऱ्यांत गैरसमज निर्माण होतात जर जोडणी वेळी आणि काढते वेळी ते मीटर रिडींग सांगितल्यास तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी मागणी करताच यावर्षी पासून रिडींग सांगितले जाईल असे आश्वासन दिले अशी माहिती नेताजी जाधव यांनी दिली.
सर्वच परवानग्या साठी शहापुर भागात सिंगल विंडो लागू सिस्टम लागू करा अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली.शहापूर गणेश महा मंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव यांच्या सह गणेश मंडळांचे सदस्य उपस्थित होते.