बेळगाव शहर परिसरात कुठे कचरा पडेल कुठे नाही याचा नेमच नाही असाच कचरा राष्ट्रीय महा मार्गाशेजारील सर्व्हिस रोड वर टाकल्याने दुर्गंधी पसरली आहे.
गेल्या वर्षी पावसाळ्या अगोदर हा कचरा काढण्याचे सोंग घेण्यात आले मात्र पुन्हा ये रे माझ्या मागल्या झालं असून रस्त्याशेजारील कचरा तिथेच पडून आहे.
पुन्हा एकदा पुणे बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर अलारवाड क्रॉस पासून बेळगाव कडे यायच्या दिशेने नाल्या जवळ सर्व्हिस रस्त्यावर कचऱ्याचे ढीगच ढीग तयार झाले आहेत. या कचऱ्याची उचल व्हावी आणि इथे कोण कचरा टाकत आहे त्यांच्या वर देखील कारवाई केली जावी अशी मागणी केली जात आहे.
शहर परिसराची स्वच्छ भारत अभियान नामांकनात घसरण होत असताना दुसरीकडे कचरा नियोजन योग्य रित्या होताना दिसत नाही.हायवे शेजारी गाडी भरून रात्रीच्या वेळी कचरा इथे टाकण्यात येत आहे पहिला इथे बळळारी नाला असल्याने कमी प्रमाणात कचरा टाकला जात होता मात्र गेल्या पावसा नंतर दररोज एक ढीग वाढतच आहे पालिकेने याकडे लक्ष गांभीर्याने लक्षध्यावे अशी मागणी येथून ये जा करणाऱ्या लोकातून केली जात आहे.
भागात कचरा टाकल्याने दुर्गंधी पसरली असून शेतात काम करतेवेळी ये जा करणाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. सर्व्हिस रोड वर टाकण्यात येणारा कचरा हा भाजी मार्केट केळी वखार आणि हॉटेल मधील असायला पाहिजे यावर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी केली आहे. महापौर नगरसेवक आरोग्य खाते याकडे लक्ष देतील का?शहराला स्मार्ट करायचे असल्यास स्वच्छता राखावी लागेल.