महाराष्ट्र एकीकरण समितीचे एकनिष्ठ कार्यकर्ते प्रभाकर धोत्रे यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने सीमाप्रश्नाच्या लढ्याचे नुकसान झाले आहे. एक निष्ठावान कार्यकर्ता काळाच्या ओघात हरपला आहे.
धोत्रे हे लहान पणापासून सीमाप्रश्नातील बिनीचे शिलेदार होते. बैठक असो, मेळावा असो, उपोषण असो किंव्हा आणि काही धोत्रे नसताना कुठलाच कार्यक्रम झाला नाही. पहिल्या रांगेत बसून ते आपली उपस्थिती लावत होते. कधीही आणि कुठल्याही वेळी सीमाप्रश्न म्हटलं की तडफुन उठणारा माणूस ही त्यांची ओळख.
प्रत्येक सत्याग्रह आंदोलनात त्यांनी भाग घेतला आहे. सीमाप्रश्न लवकर सोडवा अशी मागणी करणारी पत्रे त्यांनी आजपर्यतच्या प्रत्येक पंतप्रधान आणि खासदाराला लिहिली आहेत. महाराष्ट्रातून नेते येणार असे कळले की धोत्रे तहान भूक सोडून कामाला लागत. सभेचा मंडप उभारणी पासून त्या नेत्याच्या स्वागतापर्यत त्यांनी सगळी कामे केली आहेत.
सीमाप्रश्न सुटावा या मागणीसाठी दिवस रात्र एक करणारे, पद स्वार्थ किंव्हा निवडणूक लढवून पैसे कमवन्याचे प्रामाणिकपण व्यक्तिमत्व हा लढा सोडून गेले आहे.