काँग्रेस जनता दलाचे कर्नाटकातील सरकार कोसळायला जारकीहोळी कुटुंब जबाबदार नसून एक वस्तू कारणीभूत असल्याचा गौफ्यस्फोट माजी मंत्री व यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी केला आहे. बंगळुरू येथे पत्रकारांशी बोलत होते.
या सरकारच्या जाण्यास जारकीहोळी कुटुंबाचा संबंध आहे असे बोलले जात आहे ते साफ चुकीचे आहे असे म्हणत त्यांनी सरकार घालवणारी ती वस्तू कोणती आहे हे लवकरच जाहीर करू असंही म्हटलं आहे.
काही लोक सरकार जाण्यास रमेश जारकीहोळी जबाबदार असे आरोप करत आहेत ते केवळ जारकीहोळी परिवाराचे नाव बदनाम करण्याचे षडयंत्र आहे मात्र कोणत्या कारणानं सरकार गेलंय हे लवकरच जनतेला सांगतो असेही त्यांनी नमूद केलंय.
राज्य सरकार कोसळण्यास अनेक कारणे माध्यमातून समोर येत आहेत.एच डी रेवन्न यांचा वाढता हस्तक्षेप,जारकीहोळी बंधूंतील वाद ,बेळगावातून पडलेली पी एल डी बँकेची ठिणगी आणि मंत्री पद अशी कारणे समोर येत असताना सतीश जारकीहोळी यांनी कोणत्या एका वस्तू मूळे सरकार पडलं हे जाणून घेण्यासाठी लोकांची उत्सुकता वाढली आहे.