गोकाकचे काँग्रेसचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी अखेर आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. सोमवारी सकाळी काँग्रेस चे आणखी एक आमदार आनंद सिंह यांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमी नंतर रमेश जारकीहोळी यांना देखील राजीनामा दिला आहे .
विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला आहे आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर जारकीहोळी हे दिल्लीला रवाना झालेले आहेत.
स्वतःच्या हस्ताक्षरात ने आपल्या लेटरपॅडवर त्यांनी राजीनामा पत्र देत मी स्व खुशीने राजीनामा देत आहे असे देखील त्यांनी पत्रात म्हटलं आहे. विजयनगरचे आमदार आनंद सिंह यांनी राजीनामा दिल्या नंतर रमेश जारकीहोळी हे राजीनामा देणारे दुसरे काँग्रेसचे आमदार ठरले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कर्नाटकातील युतीचे काँग्रेस सरकार संकटात सापडले आहे.