राज्यातील काँग्रेस जे डी एस चे मैत्री सरकार पाडवण्यात यशस्वी ठरलेले गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांच्यावर कारवाई करत त्यांचे आमदारकीचे पद रद्द करण्यात आली आहे. जारकीहोळी यांच्या सोबत त्यांचे सहकारी अथणीचे महेश कुमठहळळी व राणीबेनूरचे आर शंकर यांचेही निलंबन झाले असून त्यांनाही पद गमवावे लागले आहे.
कर्नाटक विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी हा आदेश बजावला आहे. बंगळुरू येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी कारवाईची माहिती दिली. गेल्या काही दिवसांत बंडखोर आमदारांनी चालवलेला घोळ आणि घटनाबाह्य कृती बद्दल माहिती देत अजून काही बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
सभापती रमेश कुमार यांनी केलेल्या कारवाई नुसार रमेश जारकीहोळी आणि महेश कुमठहळळी यांना 2023 पर्यंत कोणतीही निवडणूक लढवू शकत नाहीत या शिवाय राणीबेनूरचे आमदार आर शंकर हे 2023 म्हणजे तीन वर्षे दहा महिने निवडणूक लढवू शकत नाहीत.जारकीहोळी कुमठहळळी सहा वर्षे तर आर शंकर यांच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.