जिल्ह्यात महिन्यात 1057.3 मीमी पाऊस -बेळगाव जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात जुलै महिन्यातही चांगला पाऊस झाला असून एकूण 1057.3 मीमी पावसाची नोंद झाली आहे.
तालुकावर जुलै महिन्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी मिळाली आहे. अथणी येथे 28.9 मीमी इतका कमी पाऊस झाला असून खानापूर तालुक्यात सर्वाधिक 656.2 मीमी पाऊस झाला आहे.
चिकोडीत 72, गोकाक 78, हुक्केरी 87.2, रायबाग 49.4, रामदुर्ग 56.7 आणि सौन्दत्ती येथे 139.4 मीमी पाऊस झाला असून बेळगाव तालुक्यात 298.2 व बैलहोंगल मध्ये 212.6 मीमी पाऊस झाला आहे. खानापूर तालुक्यातील कणकुंबी येथे सर्वाधिक पाऊस पडतो तर रायबाग अथणी तालुक्यात कमी पाऊस होतो.