राज्य सरकारने नुकताच जलामृत योजनेसाठी शंभर कोटीचा निधी मंजूर केला आहे. या योजनेतून जमिनीतील पाण्याचा पोत वाढवण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. तालुका पंचायत जिल्हा पंचायत आणि ग्रामपंचायत माध्यमातून ही योजना राबविण्यात येणार आहे.
डोंगरमाथ्यावरून येणाऱ्या पाण्याचा जमिनी वर बांध बांधून ते जमिनीत जिरविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींना याबाबत आराखडा तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जर असे झाल्यास पाणीपातळीत वाढ होऊन पाणी समस्या मिटणार आहे.
पाणी पातळी वाढवण्यासाठी ग्रामपंचायतींना या योजनेतून पाचशे झाडे लावण्याचा आणि ती जगवण्याचा प्रयत्न करण्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ही योजना प्रत्येक ग्रामपंचायतीने यशस्वीपणे राबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुका पंचायतीमध्ये या योजनेचा आराखडा तयार करण्याबाबत बैठका घेण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात ही योजना नियोजनबद्धरीत्या राबवण्यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जलामृत योजनेसाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करून ती यशस्वी करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे अशा सूचनाही अधिकाऱ्यांनी केल्या आहेत.