बेळगाव येथील जी एस कॉलेज च्या वनस्पतीशास्त्र विभागाने विद्यार्थ्यांना वृक्षांची माहिती देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. प्रत्येक वृक्षावर एक क्यू आर कोड बसऊन त्या क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर विद्यार्थ्यांना वृक्षांची माहिती देण्याची व्यवस्था या महाविद्यालयाने केले आहे.
यासाठी महाविद्यालय अनेक वृक्षांच्या माहितीचे भांडार उपलब्ध केले आहे. इंटरनेटवर ही माहिती मिळणार आहे .झाडावर लावलेला क्यूआर कोड मोबाईल वरून स्कॅन केला असता ही माहिती मिळणार असल्याची माहिती कॉलेज तर्फे देण्यात आली.
आर पी डी आणि जी एस एस कॉलेज आवारामध्ये वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे, वेग वेगळे जातीचे तसेच औषधी वृक्ष लावण्यात आले आहेत. आरोग्याला उपयुक्त ठरणारे, हवामानाला उपयुक्त ठरणारे, जास्त ऑक्सिजन सोडणारे, याचबरोबरीने हवा शुद्ध करणारे असे वेगवेगळे वृक्ष आवारात आहेत .
महाविद्यालय येणाऱ्या विद्यार्थ्यांना या संपूर्ण वृक्षांची माहिती मिळावी आणि तेही वृक्षारोपणा कडे आकर्षित व्हावे हा उद्देश यामागे ठेवण्यात आला आहे.