प्यास फौंडेशन आणि ए के पी फौंड्रीज यांच्या वतीने यंदा मच्छे येथील तिसऱ्या तलावाचे पुनरूजीवन करण्यात आले आहे. हा तलाव होई पर्यंत पाणी समस्या सोडविण्यासाठी प्यास ने टँकर ने पाणी पुरविले होते.
2016 च्या मे मध्ये कामाला सुरुवात करून तेथील पाणी समस्या सोडवण्याचा विडा उचलण्यात आला होता. प्यास ने पुढाकार घेतल्यावर प्रसिद्ध उद्योजक राम भंडारे यांनीही मदत करण्याची तयारी दाखवून या गावाची पाणी समस्या सोडविण्यात पुढे आले. यावर उपाय शोधल्यावर तलाव पुन्हा कार्यरत करण्याचा एकमेव पर्याय शिल्लक होता. दहा एकर मध्ये पसरलेला हा तलाव येथील मासळी साठी प्रसिद्ध होता.
गाळ साचून या तलावाची अवस्था बिघडली होती. त्यात सुधारणा करणे फार अवघड होते. दोन वेळा केलेले प्रयत्न अपयशी ठरले होते. याचवेळी तरुण उद्योजक पराग भंडारे यांनी पाठबळ दिले आणि काम सुरू झाले होते.
लवकरच हा तलाव नागरिकांच्या हाती दिला जाणार आहे.यंदा मोठ्याप्रमाणात पाणी साचवून घेण्याची क्षमता निर्माण झाली आहे.