शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आलेल्या अर्जांची पाहणी आणि ते सरकारकडे पाठवून मंजुरीसाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. शहर असो वा ग्रामीण भागात अजून एकाही गरजूला याचा लाभ झाला नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे ही योजना बारगळली काय असा प्रश्न अनेकातून उपस्थित झाला आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागासह शहरी भागातही अनेक आणि अर्ज दाखल केले आहेत ज्यांना घरांची गरज आहे त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतून अर्ज करावा असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले होते. मात्र हे आवाहन फोल ठरत आहे. तब्बल दीड ते दोन वर्ष झाले तरी अजून एकाही अर्जाला मंजुरी मिळाली नाही.
ग्रामपंचायत आणि महानगरपालिका यांच्याकडे हजारो अर्ज करण्यात आले आहेत. त्या अर्जांची छाननी देखील अजून झाली नाही ते अर्ज थेट केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे अजूनही या अर्जावर कोणत्याच हालचाली झाल्या नसल्याचे दिसून येत आहे.
गोरगरिबांना घरे देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात आले होते. हे अर्ज संबंधित विभागाने केंद्र सरकारकडे पाठवून दिले आहेत. मात्र जिल्ह्यात अजून एकाही घराला मंजुरी मिळाली नसल्याने ज्यांनी अर्ज केले आहेत. त्या अर्जदारातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. लवकरच परवानगी मिळणार अशी आशा अधिकारी दाखवत असले तरी अजून तसे कोणतेही चिन्ह दिसत नाही. त्यामुळे ही योजना बारगळणार काय असा सवाल उपस्थित होत आहे.