शाळेची इमारत जुनी असल्याने छत कोसळून एक विद्यार्थीनी किरकोळ जखमी झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील गोजगा प्राथमिक मराठी शाळेत घडली आहे.
बेळगाव तालुक्यातील पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू आहे गोजगा प्राथमिक मराठी शाळेची इमारत जुनी झाली आहे.शनिवारी सकाळी शाळेत एका बाजूची भिंत कोसळली तर छत जुनं झाल्याने कौल देखील पडली आहेत कौल पडून विद्यार्थिनी जखमी झाली लागलीच तिच्यावर उपचार करण्यात आले आहेत. या भागातील लोक प्रतिनिधींचे मराठी शाळांकडे दुर्लक्ष झाले आहे.
मराठी शाळांकडे शासनाचेअसे दुर्लक्ष होत आहे अगोदरच मराठी शाळेत विद्यार्थी कमी होत आहेत जिल्हा पंचायत आरोग्य शिक्षण स्थायी समिती अध्यक्ष रमेश गोरल यांनी लक्ष देऊन सदर शाळेची इमारत दुरुस्त करून द्यावी अशी मागणी केली जात आहे.
सोमवारी गावातील युवकां कडून गेट बंद आंदोलन केले जाणार असून शाळेची इमारत लवकरात लवकर दुरुस्त करावी अशी मागणी केली जाणार आहे.