सरकार पाडवायचे आणि सरकार कसं वाचवायचे हे बेळगावच्या राजकारण्यांना चांगलं जमते असे मत राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे यांनी व्यक्त केलंय. बेळगावात शनिवारी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतेवेळी ते बोलत होते.
आताचे काँग्रेस जे डी एस चे मैत्री सरकारच नव्हे तर निजलींगप्पा काळा पासून राज्य सरकार मध्ये बेळगावचा प्रभाव आहे. भाजप सध्या महासागर बनला आहे कुणीही पक्षात आले तर त्यांचे स्वागत आहेच. बेळगावातमुख्यमंत्री व्हायची क्षमता असलेले राजकारणी आहेत कुणी मुख्यमंत्री झालो नाही म्हणून नाराज आहेत मात्र उपमुख्यमंत्री पदाचे दावेदार इथे नाहीत असेही त्यांनी नमूद केलं.
राज्यातील जनतेच्या मागणी नुसार येडीयुराप्पा मुख्यमंत्री झालेत चारच का बेळगावला पाच मंत्री पदे मिळाली तर आम्हाला आनंदच आहे असेही त्यांनी म्हटलं आहे.