मूर्तिकार,गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि विक्रेत्यांची पुन्हा बैठक घ्या अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांना दिले आहेत मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात मध्यवर्ती सार्वजनिक गणेश महामंडळ आणि शहापूर गणेश महामंडळाच्या पदाधिकाऱ्यां सोबत पालकमंत्र्यांची भेट घेतली असता जारकीहोळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मूर्तिकार गणेश मंडळ विक्रेत्यांची पुन्हा एकदा बैठक घ्या अशा सूचना दिल्या आहेत.
गणेश उत्सव दोन महिन्यावर येऊन ठेपला आहे शहरातील गणेश मंडळांनी चार महिन्यापूर्वीच गणेश मूर्ती बनवण्याची ऑर्डर दिली आहे मूर्तिकारांनी मूर्तींचे काम देखील पूर्ण केले अहेअश्यात पी ओ पी मूर्ती बंदीची अमल बजावणी करणे कितपत योग्य आहे असा सवाल गणेश म्ह मंडळांने केला.
शहरात मनपाच्या वतीने विसर्जन कुंड बनवलेले आहेत त्यामुळे पी ओ पी प्रदूषण होण्याचा प्रश्नच उदभवत नाही पुढील वर्षी जनजागृती करून या निर्णया बाबत अंमल बजावणी करावी अशी मागणी दोन्ही गणेश मंडळांनी केली.
बैठकीत सतीश जारकीहोळी यांनी सूचना करताच पी ओ पी बनवणारे मूर्तिकार,महामंडळ तसेच मूर्ती विक्रेते यांची लवकरच बैठक घेऊ असे आश्वासन डी सी बोमनहळळी यांनी दिले.त्यामुळे पी ओ पी अंमल बजावणी पूर्वी पुन्हा एकदा बैठक होणार आहे. यावेळी गणेश महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.