शहरात एकीकडे अंमली पदार्थांची तस्करी वाढत असताना अनेक तरुण व्यसनाधीन होत असताना शहापूर पोलिसांनी मात्र व्यसनापासून दूर रहा असा संदेश युवकांना द्यायला सुरुवात केली आहे.
शहापूर पोलीस स्थानक कार्यक्षेत्रातील जुने बेळगाव गावात अनेक युवक व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत अश्या युवकांना मार्गदर्शन करीत व्यसन मुक्तीचा संदेश दिला जात आहे.
जुने बेळगाव येथे बुधवारी रात्री पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांनी युवकांना एकत्रित करून व्यसन मुक्तीचा संदेश दिला.मुशाफिरी यांनी या गावातील युवकांना गांजा,मटका,दारू,जुगार आदी व्यसनापासून दूर रहा शिक्षण पूर्ण करून अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगा व आपले जीवन मान सुधारा असे आवाहन केले.
व्यसन करणाऱ्यावर नियंत्रण आणण्यासाठी गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिसांनी युवकात जाऊन समुपदेशन देखील केले आहे. एकेकाळी जुने बेळगावात व्यसन करणाऱ्यांची संख्या अल्प होती आजच्या घडीला हीच संख्या वाढली अश्या युवकात जनजागृती करण्यासाठी शहापूर पोलिसांनी पुढाकार घेतला आहे आहे शहरातील इतर पोलिस स्थानकानी देखील असेच कार्य करायला हवे.
लक्ष्मी मंदिरात झालेल्या बैठकीत मनोहर होसुरकर,जितेंद्र चौगुले,देविदास खननुकर,विनोद सालगुडी, संतोष शिवणगेकर,नितीन खन्नुकर, सुनील टपाले,योगेश धामणेकर आदी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.