जिल्हा प्रशासनाने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्याचे ठरवले आहे.सर्व अधिकाऱ्यांनी प्लास्टिक बंदीचा आदेश मानत प्लास्टिक ध्वज वापरू नये प्लास्टिक ध्वज बंदीची अंमलबजावणी काटेकोर पणे करा अश्या सूचना जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात यावर्षीचा स्वातंत्र्य दिना बाबत आयोजन बैठकीचे आयोजन केले त्या बैठकीत ते बोलत यावेळी जिल्ह्यातील विविध खात्याचे अधिकारी वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.15 आगष्ट स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण असून शासकीय अधिकाऱ्यांनी सुट्टी आहे असे म्हणून सहलीला न जाता आपल्या कुटुंबियांसह स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात सहभागी व्हावे दिलेली जबाबदारी प्रत्येकाने योग्य रित्या पार पाडा असे आवाहन देखील त्यांनी केले.
विद्यार्थी प्लास्टिक ध्वज वापरू नयेत याची काळजी पालक शिक्षक अधिकाऱ्यांनी घ्यावी दुकानांतून प्लास्टिक ध्वज,प्लास्टिक पताका विक्री होऊ नयेत याची दक्षता देखील अधिकारी घ्यायला हवी अश्या सूचना करत त्यांनी शाळा कॉलेज संस्थांनी कापडी ध्वज वापरावा असे देखील आवाहन केलं. बेळगाव शहरात साफ सफाई स्वच्छता अभियान हाती घेऊन परेडची तयारी पूर्ण करा अश्या सूचना देखील केल्या