सोमवारी सकाळी पासून बेळगाव शहर परिसरात दमदार पाऊस होत आहे त्यामुळे एकीकडे जनजीवन विस्कळीत झाले आहे तर दुसरीकडे शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी तुंबलेली दृश्य पहायला मिळत आहेत.
संभाजी नगर वडगांव मध्ये रस्त्यावर पाणी आलं होतं त्यानंतर बी एस येडीयुराप्पा मार्ग म्हणजे जुन्या पी बी रोडवर देखील रस्त्यावर पाणी साचलं आहे या पाण्यामूळे ये जा करणाऱ्या वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
महामार्गाची स्थिती अशी असेल त्यावेळी शहरातील सामान्य रस्त्यांची अवस्था काय असेल रस्त्यावर पाण्याचा निचरा योग्य होत असल्याने चक्क महा मार्गावर पाणी आलं आहे. या अगोदर देखील रस्त्या शेजारील गटारीतुन पाणी जात नसल्याने पाणी रस्त्यावर आलं होतं या आजच्या मोठया पावसा नंतर तीच अवस्था आहे.
शहरातील नाले सफाई योग्य झालीं नसल्याने राजमार्गांची देखील हीच अवस्था झालो आहे.बेळगाव स्मार्ट कधी होणार हाच प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.